ताजी बातमी ऑनलाईन टीम
दुकानदार मला पैसे देतात, मग तू का देत नाहीस. मला पैसे दिले नाहीस तर तुला भोकसतो, जीवंत ठेवत नाही, अशी नितीन यशवंत खोपडे (वय ३७, रा.टेंबलाईवाडी) या हॉटेल व्यावसायीकास धमकी देणाऱ्या संशयीत संकेत हर्षद बिरांजे (रा. राजारामपुरी) या तरुणावर शाहपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल झाला आहे.
मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्समध्ये नितीन खोपडे यांचे हॉटेल आहे. संकेत यांच्याकडून वारंवार शिवीगाळ व मारण्याची धमकी येत असल्याने हॉटेल व्यावसायीक खोपडे वैतागले होते. त्यांनी शाहपुरी पोलीस ठाण्यात जाऊन पो. नि. रमेश गवळी यांच्याकडे तक्रार दाखल केली.