Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरपंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत 4.95 लाख

पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत 4.95 लाख

ताजी बातमी ऑनलाईन टीम

महापालिकेची पंचगंगा स्मशानभूमीतील गुप्तदान पेटी सोमवारी उघडण्यात आली. यात 4 लाख 95 हजार 317 रु. आणि चांदीची चार जोडवी मिळाली. यापूर्वी जून 2021 मध्ये दानपेटी उघडली होती. त्यावेळी 9 लाख 50 हजार रु. मिळाले होते. दरम्यान, दानपेटीत काही बेरोजगारांनी स्मशानभूमीत रोजंदारीवर नोकरी मिळावी म्हणून टाकलेल्या दोन चिठ्ठ्याही मिळाल्या.


महापालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प येथे स्मशानभूमी आहेत. याठिकाणी महापालिकेच्या वतीने मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतात. पंचगंगा स्मशानभूमी व इतर ठिकाणी गुप्तदान पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आणि रक्षाविर्सजनासाठी येणारे नागरिक या दानपेटीत दान करतात. स्मशानभूमीतील गुप्तदान पेटी सहायक आयुक्त संदीप घार्गे व मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक महेश भोसले, मुख्य लेखापरीक्षक विभागाचे अजित टिटवेकर यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -