Tuesday, July 29, 2025
HomeमनोरंजनRashmika Mandanna Birthday Special: 26 वर्षांची रश्मिका मंदान्ना अशी झाली 'नॅशनल क्रश',...

Rashmika Mandanna Birthday Special: 26 वर्षांची रश्मिका मंदान्ना अशी झाली ‘नॅशनल क्रश’, असा आहे तिचा फिल्मी प्रवास!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

साऊथ फिल्म इंडस्ट्रीची (South Film Industry) सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आज आपला 26 वा वाढदिवस (Rashmika Mandanna Birthday) साजरा करत आहे. नॅशनल क्रश असलेल्या रश्मिका मंदान्नाने तिच्या छोट्याशा कारकिर्दीत यशाचे उंच शिखर गाठले आहे. रश्मिकाने तिच्या गोंडस हास्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. 2016मध्ये ‘किरिक पार्टी’ या चित्रपटाद्वारे कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी रश्मीका आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. फक्त दक्षिण भारतामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये रश्मिकाचा चाहता वर्ग आहे. रश्मिकाने कन्नड, तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये (Rashmika Mandanna Movies) काम केले आहे. आजा रश्मिकाच्या वाढदिवसानिमित्त आपण तिचा आपण तिचा जीवन प्रवास पाहणार आहोत.



रश्मिकाने आतापर्यंत केवळ 11 ते 12 चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण, चित्रपटांच्या यशामुळे आणि तिच्या टॅलेंटमुळे या अभिनेत्रीने प्रचंड फॅन फॉलोइंग तयार केले आहे. 2020 मध्ये गुगलने रश्मिकाला नॅशनल क्रश ही पदवी दिली. त्यानंतर तिची लोकप्रियता आणखी वाढत गेली. रश्मिका मंदान्ना लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसंच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुड बाय’ हा हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी रश्मिका मंदानाला मिळाली आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत इतक्या लहान वयात काम करणे ही काही छोटी गोष्ट नाही. तिचा हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

रश्मिकाचा जन्म 5 एप्रिल 1996 रोजी कर्नाटकातील विराजपेट येथे झाला. तिने शिक्षणही कर्नाटकातच पूर्ण केले. तिने तिच्या शिक्षण सुरु असतानाच रश्मिकाने मॉडेलिंग सुरू केले आणि वयाच्या 19व्या वर्षीच तिला तिच्या पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली. रश्मिकाने 2016 मध्ये ‘किरिक पार्टी’ या चित्रपटाद्वारे कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. रश्मिकाने 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चालो’ चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर रश्मिकाने ‘गीता गोविंदम’, ‘देवदास’, ‘डियर कॉम्रेड’, ‘सारीलेरू नीकेवारू’, ‘भीष्म’ आणि ‘पुष्पा’ या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. रश्मिकाचा ‘गीता गोविंदम’ चित्रपट खूप सुपरहिट ठरला. या चित्रपटासाठी तिला 2019 मध्ये फिल्मफेअर पुरस्कार दक्षिणेकडील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -