‘पुष्पा द राइज’ (Pushpa The Rise Movie) या चित्रपटाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर (Box Office) जादू करणारा दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आज वाढदिवस (Allu Arjun Birthday) आहे. अल्लू अर्जुन 8 एप्रिल म्हणजे आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. अल्लू अर्जुनने आपल्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष केला तेव्हा कुठे तो इतवर येऊन पोहचला आहे. त्याचा सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता.
गेल्या काही काळापासून अल्लू अर्जुनने देशभरात चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. दक्षिणेतील दमदार अभिनय आणि उत्कृष्ट अॅक्शनसाठी ओळखल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनची फॅन फॉलोइंग बॉलीवूड स्टारपेक्षा काही कमी नाही. अल्लू अर्जुनचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरला असून प्रेक्षकांनी त्याला चांगली पसंती दिली आहे. आज अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त (Allu Arjun Birthday Special) त्याच्या आयुष्याशीसंबंधित काही रंजक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत…
8 एप्रिल 1982 साली मद्रासमधील एका तमिळ फॅमिलीमध्ये अल्लू अर्जुनचा जन्म झाला. अल्लू अर्जुनला तीन वर्षांचा असताना कॅमेरा फेस करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली होती. त्यावेळी अल्लू अर्जुनने ‘विजेता’ चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते. हा चित्रपट 1985 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अल्लू अर्जुनने 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या डॅडी चित्रपटात देखील काम केले. त्यानंतर थेट 2003 मध्ये अल्लू अर्जुन ‘गंगोत्री’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘अला वैकुंठपुरमलो’, ‘सरायनाडू’, ‘डीजे’, ‘रेस गुर्रम’, ‘पुष्पा द राइज’ हे अल्लु अर्जुनचे सुपरहिट चित्रपट आहेत.
अल्लु अर्जुन कोट्यवधीचा मालक आहे. त्याच्याकडे एकूण 356 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अल्लु अर्जुन एका चित्रपटासाठी 14 ते 15 कोटी रुपये घेतो. अल्लु अर्जुन हैदराबादच्या जुबली हिल्स परिसरात राहतो. याठिकाणी त्याचा ब्लेसिंग नावाचा आलिशान बंगला आहे. त्याच्या या बंगल्याची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे. याठिकाणी तो पत्नी आणि आपल्या कुटुंबासोबत राहतो. अल्लु अर्जुनचे घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही.
अल्लू अर्जुन खूपच लॅविश लाईफ जगतो. तेवढाच तो आपल्या मातीशी देखील जोडलेला राहतो. अल्लू अर्जुनकडे लग्झरियस व्हॅनिटी व्हॅन आहे. या व्हॅनचे नाव फॉल्कन आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याच्या या व्हॅनची किंमत इतकी आहे ही त्याच्या किमतीमध्ये एखादा चित्रपट तयार होऊ शकेल. त्याच्या या व्हॅनिटी व्हॅनची किंमत 7 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
अल्लू अर्जुनचे घर, व्हॅनिटी व्हॅन खूपच आलिशान आहेत. त्याचसोबत त्याला लक्झरी कारची देखील खूप आवड आहे. अल्लू अर्जुनला महागड्या आणि आलिशान गाड्यांची खूप आवड आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर कार आहे. या कारचे नाव त्याने बीस्ट ठेवले आहे. या कारची किंमत जवळपास 2.50 कोटी रुपये ऐवढी आहे. या व्यतिरिक्त त्याच्याकडे 80 लाखांची बीएमडब्ल्यू एक्स 5 आणि जगुआर एक्सजे एल, ऑडी ए 7 या आलिशान गाड्या आहेत.