टाटा ग्रुपने त्यांचे ‘ टाटा न्यू सुपरअॅप’ लाँच केले आहे. युजर्स ग्रोसरी पासून फ्लाईट बुकिंग पर्यंत अनेक प्रकारच्या सेवा याच्या मदतीने मिळवू शकणार आहेत. आपले सर्व ब्रांड एकाच प्लॅटफॉर्मवर युजर्सन मिळावेत यासाठी हे अॅप लाँच केले गेले आहे. त्यात शॉपिंग पासून पेमेंट पर्यंत सर्व सेवा मिळणार आहेत.
टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी गुरुवारी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे,’ टाटा न्यू टेक्नोलॉजी आणि आधुनिक स्वभावानुसार, पारंपारिक युजर्स सर्वप्रथम, या दृष्टीकोनातून हे अॅप सादर करत आहे. टाटा परिवारातील सर्वात छोटा सदस्य टाटा डिजिटलच्या न्यू अॅपवर टाटा ग्रुप विविध डिजिटल सेवा देत आहे.’ यात एअरआशिया इंडिया, एअर इंडिया फ्लाईट तिकिटे बुक करणे, ताज ग्रुप हॉटेल बुकिंग, बिगबास्केट मधील किराणा आणि अन्य ग्राहकोपयोगी वस्तू, वन एमजी मधून औषधे, क्रोमा मधून इलेक्ट्रिक, इलेक्ट्रोनिक सामान, वेस्टसाईड मधून कपडे खरेदी अशा विविध सेवा दिल्या जाणार आहेत.
टाटा न्यू वर प्रत्येक ब्रांड साठी न्यू कॉईन रिवार्ड जोडलेला असून ऑनलाईन अथवा फिजिकल लोकेशन सर्व ब्रांड मध्ये अर्न करता येणार आहे. पेमेंट, मनी ट्रान्स्फर साठी टाटा पे युपीआय ऑप्शन असून दोस्त, परिवार सदस्यांना युजर पैसे पाठवू शकेल. याचा वापर कोणताही क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट साठी करता येणार आहे. इलेक्ट्रिक बिले, डीटीएच अशी बिले भरण्यासाठी सुद्धा याचा वापर करता येणार आहे.