Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रचोरट्यांचा धुमाकूळ : जावळी तालुक्यात एका रात्रीत आठ गावात 21 घरफोड्या

चोरट्यांचा धुमाकूळ : जावळी तालुक्यात एका रात्रीत आठ गावात 21 घरफोड्या

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील गुरूवारी रात्री एकाच वेळी 21 बंद घराच्या घरफोडी करून रोख रक्कम, सोने आदी साहित्य लंपास केला असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना जावळी तालुक्यातील करंजे, सावली, आसणी, भोगवली, पुनवडी, केडंबे, वाळंजवाडी आणि वरोशी या 8 गावातील एकूण 21 बंद घरं फोडून झाल्याचं उघडकीस आलं आहे. मध्यरात्री घरफोडी झाली असून चोर लाखो रुपयांची रोख रक्कम आणि साहित्य घेऊन पसार झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे जावळी तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जावली तालुक्यातील चोरांबे गावांत चोरीचा प्रयत्न फसून गावाच्या सी. सी. टी. व्ही. मध्ये कैद झाले आहेत. शुक्रवारी सकाळी सातच्या दरम्यान याची माहिती मेढा पोलिसांनाच लागताच सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी घटनास्थळी भेटी देवून तपास गतिमान केला आसून श्वान पथक बोलवले आहे. जावळीत ही एकाच रात्रीत बंद घरांची घरफोडी घडण्याचा प्रकार अनेक वेळा घडला असला तरी एकाच वेळी 21 घरफोड्या होण्याचा मोठी घटना घडली असून पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -