Wednesday, February 5, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर: पैसे वाटणाऱ्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी पकडले, भाजपवर आरोप

कोल्हापूर: पैसे वाटणाऱ्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी पकडले, भाजपवर आरोप

ताजी बातमी ऑनलाईन टीम

उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी(Assembly by-elections) प्रचाराचा कालावधी संपला आहे. या प्रचाराच्या काळात भाजप आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केल्याचं पहायला मिळालं. पण त्याच दरम्यान आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर पैसे वाटप करताना काहींना पकडल्याचाही दावा करण्यात आला आहे. पैसे वाटण्याचा संशयावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीन जणांना पकडले आहे.



हे भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप काँग्रेसने भाजपच्या कार्यकर्त्यांवर केला आहे. या तिघांनाही जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यादी घेऊन पाकिटातून पैसे वाटप करत असल्याचा आरोप काँग्रेसचय्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.



पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. कालच्या सभेत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल कोल्हापूर, 10 एप्रिल : काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी (Assembly by-elections) रविवारी (10 एप्रिल) उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन माध्यमातून सभेला संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे.

आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. काल नानांच्या प्रचाराला फडणवीस येऊन गेले. बऱ्याचदा असं होतं की, आपल्याकडे बोलण्यासाठी काही मुद्दे नसतील तर खोटे आरोप करायचे, एक भ्रम निर्माण करायचा आणि आपलं घोडं कुठे पुढे सरकतं याकडे पहायचं ही यांची एक वाईट सवय झाली आहे. कधी-कधी असा विचार येतो की, आज राम नवमी आहे प्रभू रामचंद्रांचा अवतार झालाच नसता तर यांचं राजकारण कसं झालं असतं.

कुठल्या मुद्द्यावर राजकारण केलं असतं. स्वत:च्या कर्तृत्वाचं सांगण्यासारखं काहीच नाहीये यांच्याकडे… मग धार्मिक मुद्दे पुढे कर, द्वेष पसरवणारे पुढे कर हे असं काही करायचं आणि आपलं इच्छित असेल ते साध्य करायचं. लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरकरांनी एक छान घोषणा दिली होती.

आमचं ठरलंय म्हणजे काय… जे ठरलं होतं ते त्यांनी करु दाखवलं. आमचं ठरलंय म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादीने केलं होतं. कोल्हापुरातून भगवा घेऊन एक खासदार आपण दिल्लीत पाठवला.

त्यानंतर काय झालं? जे आता बोंबलतायत की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. कसं काय सोडलं? तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडंल नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. तुम्ही काय हिंदुत्वाचं पेटंट घेतलेलं नाहीये असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -