जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांच्या सहा शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत. या शाळांनी मान्यता न घेतल्यास एक लाख रुपयांचा दंड होण्याची शक्यता आहे.
शिक्षण विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंच्या अनेकांनी इंग्रजी माध्यम विद्यालये सुरू केली आहेत. या विद्यालयांचे प्रमाणपत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने रद्दबातल केले आहे. सांगली शहरात लक्ष्मीनगरमधील, धामणीजवळील, मिरजेतील, अंकलीतील, तासगावमधील काही विद्यालयांनी ना-हरकत प्रमाणपत्राची मुदत संपूनही शाळा अनधिकृतपणे सुरू ठेवल्या आहेत.
ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन सुरू असलेल्या सर्व विद्यालयांची जिल्ह्यातील नावे सर्व अनधिकृत म्हणून घोषित करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे सुनील फराटे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मान्यता प्रमाणपत्राशिवाय शाळा चालविण्यास येत असेल तर संबंधित संस्थाचालक यांना एक लाखापर्यंत दंड करण्याची तरतूद आहे. तसेच शाळा अनधिकृत सुरू ठेवल्यास प्रतिदिवस दहा हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच या विद्यालयांमध्ये आरटीईनुसार 25 टक्के प्रवेश दिले आहेत. पण या शाळांना परवानगी नसल्याने हे प्रवेश नियमबाह्य आहेत. त्यामुळे या शाळांना शासनाने 25 टक्के रक्कम अदा करू नये. याशिवाय जिल्हा शिक्षण विभागाने सन 2022 या शैैक्षणिक वर्षात या विद्यालयांची अनाधिकृत नावे घोषित करण्यात यावीत. अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
या जिल्ह्यात सहा इंग्रजी शाळा अनधिकृत
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -