Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगएकाचवेळी विद्यार्थ्यांना घेता येणार दोन पदव्या

एकाचवेळी विद्यार्थ्यांना घेता येणार दोन पदव्या

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मोठा निर्णय घेतला आहे. आता यूजीसीच्या निर्णयामुळे एकाचवेळी विद्यार्थ्यांना दोन अभ्यासक्रमाच्या पदव्या घेता येणार आहेत. याबाबतची घोषणा यूजीसीचे चेअरमन एम. जगदीश कुमार यांनी मंगळवारी केली. लवकरच याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जाणार आहेत.

जगदीश कुमार म्हणाले, आता विद्यार्थी एकाच विद्यापीठातील दोन वेगगेगळ्या महाविद्यालयांतून एकाचवेळी दोन अभ्यासक्रमाच्या पदवी प्राप्त करू शकतात. या पदव्या फिजिकली आणि ऑनलाईनसुद्धा संपादन करता येणार आहेत. केंद्राच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अनेक कौशल्य प्राप्त करण्यासाठी त्यामध्ये नवीन नियमांचा समावेश करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -