ताजी बातमी ऑनलाइन टीम
IPL 2022 च्या 23 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सचा सामना पंजाब किंग्जशी होत आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. मुंबईचा संघ पहिले चारही सामने हरला आहे. आजचा पहिला सामना जिंकण्यासाठी संघ मैदानात उतरला आहे. तर पंजाबच्या संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असून दोन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. दरम्यान, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला असून पहिला गोलंडाजीचा निर्णय घेतला आहे. पंजाबचा संघ पहिला फलंदाजीस उतरून मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल.
मुंबईचा कर्णधार रोहितने संघात एक बदल केला आहे. रमणदीपच्या जागी गोलंदाज टायमल मिल्सचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला. तर पंजाब किंग्सचा कर्णधार मयंक अग्रवालने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
मुंबई इंडियन्स संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.
पंजाब किंग्स संघ :
मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग.