Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रबसस्थानकात प्रसाधनगृहासाठी महिलांकडून आकारले जाताहेत पैसे

बसस्थानकात प्रसाधनगृहासाठी महिलांकडून आकारले जाताहेत पैसे


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा बसस्थानकात प्रसाधनगृहात जाणार्याच महिलांकडून पैशाची आकारणी करण्यात येत असल्याने महिलांमधून संताप व्यक्त होत आहे. सुविधा मोफत असताना महिलांकडून पैशाची आकारणी करणार्याह संबंधित कंपनीचा ठेका रद्द करावा, अशी मागणी महिलांमधून होत आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावरील मध्यवर्ती बसस्थानक म्हणून सातारा बसस्थानक ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. या बसस्थानकातून पुणे, मुंबई, सोलापूर, कोकण, कर्नाटक, बेळगाव, गोवा या ठिकाणी बसेस ये-जा करतात. त्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. या बसस्थानकात एका कंपनीमार्फत स्वच्छतागृह चालवले जाते. प्रसाधनगृहात जाणार्याप महिलांकडून संबंधित ठेकेदारामार्फत पैशाची आकारणी केली जात असल्याचे समोर आले आहे.

ही सुविधा महिलांसाठी मोफत असताना सातार्याआसह अन्य ठिकाणी पैशाची आकारणी केली जात आहे. त्यामुळे महिला व संबंधित ठेकेदारामध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांहनी लक्ष देऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी तसेच संबंधित कंपनीचा ठेका कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी महिलांमधून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -