रेल्वे प्रशासनाने प्रवाश्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. तिकिट बुंकिंगसंदर्भात भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला. यापुढे प्रवाश्यांना रेल्वे तिकीट बुक करताना आपला डेस्टिनेशन अॅाड्रेस म्हणजेच ते ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणचा पत्ता टाकावा लागणार नाही. कोरोना महामारीच्या काळामध्ये आयआरसीटीसी वेबसाईट आणि अॅवपवर रेल्वे तिकीट बुकिंग करताना डेस्टिनेशन अॅ्ड्रेस टाकणे अनिर्वाय होते. पण आता हा अॅ ड्रेस टाकावा लागणार नाही त्यामुळे प्रवाश्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या काळामध्ये रेल्वे तिकीट बुक करताना IRCTC वेबसाइट आणि अॅापवर डेस्टिनेशन अॅाड्रेस भरणे अनिवार्य करण्यात आले होते. ते भरल्याशिवाय तिकीट काढता येत नव्हते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. आता रेल्वे प्रशासनाने या निर्णयामध्ये बदल केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आता रेल्वे प्रवाश्यांना तिकीट काढताना डेस्टिनेशन अॅलड्रेस विचारण्यात येणार नाही.
रेल्वे मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले आहे. या आदेशानुसार रेल्वे मंत्रालयाने डेस्टिनेशन अॅलड्रेस विचारण्याची तरतूद रद्द केली आहे. कोरोना साथीच्या आजारादरम्यान डेस्टिनेशन अॅेड्रेसमुळे कोरोना पॉझिटिव्ह केसेस शोधण्यात खूप मदत झाली. ज्यावेळी कोरोना सुरू झाला तेव्हा कोरोनाला रोखण्यासाठी अनेक निर्णय घेतले गेले. त्याचवेळी रेल्वे प्रशासनाने देखील प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक निर्णय घेतले होते त्यापैकी एक होता डेस्टिनेशन अॅ्ड्रेसचा निर्णय आणि आता हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
आता देशामध्ये कोरोनाचा वेग मंदावला आहे. कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. त्यामुळे सरकराने कोरोनासंबंधित अनेक निर्बंध शिथील केले. त्यापाठोपाठ रेल्वे प्रशासनाने देखील अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत कोरोना काळातील निर्बंध शिथील केले. नुकताच रेल्वेने प्रवासादरम्यान डब्यात प्रवाशांना उशी-ब्लँकेट देण्यास परत सुरुवात केली आहे. आता विविध गाड्यांमधील प्रवाशांना रात्री झोपण्यासाठी उशी आणि ब्लँकेट ही सुविधा मिळणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही सेवा बंद करण्यात आली होती.
दिलासादायक! कोरोना काळातील या नियमामध्ये बदल, प्रवाश्यांना होणारा त्रास थांबणार
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -