आज सोन्याच्या दरात (Gold, silver prices) पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. गेल्या सलग तीन दिवसांपासून सोन्याचे दर वाढत आहेत. गूड रिटर्न्स वेबसाईटनुसार आज 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 53, 840 वर पोहोचले आहेत. तर 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा (दहा ग्राम) 49,350 रुपये एवढे झाले आहेत. बुधवारी 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 53,450 रुपये इतके होते. तर 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 49,000 हजार रुपये होता. याचाच अर्थ आज बुधवारच्या तुलनेमध्ये 22 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळा 350 रुपयांची तर 24 कॅरट सोन्याच्या दरात प्रति ग्राम 390 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या (silver) दरात देखील वाढ झाली असून, आज चांदी प्रति किलो 67 हजार 800 रुपयांवर पोहोचली आहे. बुधवारी चांदीचा दर प्रति किलो 67 हजार रुपये एवढा होता. आज तिच्यामध्ये 800 रुपयांची वाढ झाली आहे.
राज्यातील आजचे दर गुड रिटर्न्स बेवसाईटनुसार आज मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 49,350 एवढी आहे. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 53, 840 वर पोहोचले आहेत. पुण्यात प्रति दाह ग्रॅम 22 कॅरट सोन्याचे दर 49 हजार 400 रुपये तर 24 कॅरट सोन्याचे दर 53 हजार 890 वर पोहोचले आहेत. नागपूरमध्ये प्रति दहा ग्रॅम 22 कॅरट सोन्याचे दर 49 हजार 400 रुपये तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 53 हजार 890 वर पोहोचले आहेत. दुसरीकडे चांदीच्या दरात देखील सातशे रुपयांयी वाढ झाली असून, चादी 67 हजार 800 रुपयांवर पोहोचली आहे.