पत्नीचा खून प्रकरणी अटकेत असलेल्याा पतीने पाेलीस ठाण्याात आत्मरहत्याम केली. रवी वसंत वाघमारे ( ता. राेहा, शेणवई, आदिवासी वाडी ) असे त्याचे नाव आहे. रोहा पोलिसांनी ११ एप्रिल रोजी त्याला अटक केली होती. आज ( गुरुवार) पहाटे राेहा पोलीस ठाण्यातील कोठडीत त्यावने आत्महत्या केल्या१ने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याठसह वरिष्ठ पोलीस अधिकारी रोहयात दाखल झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, जेवण तयार करण्याकवरुन ९ एप्रिल रोजी रवी वाघमारे याचे आपल्या पत्नीशी भांडण झाले. त्या,ने लोखंडी कोयत्याने वार करून पत्नी जयश्री वाघमारे हिचा खून केला. रोहा पोलिसांनी त्याणला अटक केली. रवी वाघमारेला न्यायालयाने १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. गुरुवारी पहाटे त्याकने कोठडीमधील पांघरुणासाठी दिलेल्या चादरीची किनार फाडून कोठडी मधील शौचालयात गळफास लावून घेवून आत्महत्या केली.