केजीएफ-2’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यामध्ये अभिनेता यश याच्यासमवेत संजय दत्त आणि रविना टंडन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत असून रविनाच्या अभिनयाचेही मोठेच कौतुक होत आहे.
अनेक वर्षे संसारात व अपत्यांच्या पालनपोषणात गुरफटलेल्या रविनाचे हे दणक्यात पुनरागमन मानले जात आहे. रविना फॅशनच्या बाबतीतही मागे नाही. 47 वर्षांच्या रविनाचे इन्स्टाग्राम क्लासी आणि स्टायलिश लूक्सच्या फोटोंनी भरलेले आहे. सध्या ती ‘केजीएफ-2’ च्या प्रमोशनमध्ये मग्न आहे. त्याचबरोबर ती अनेक स्टनिंग लूक्सही शेअर करीत आहे.