ताजी बातमी ऑनलाईन टीम
खूप दिवसांपासून चर्चा सुरू होती की, सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. आता सुहाना चित्रपटात दिसणार असून तिने तिच्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आता सुहानानेही चित्रपटांमध्ये प्रयत्न सुरू केले आहेत. यात श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर आणि श्वेता बच्चन नंदा यांचा मुलगा अगस्त्य नंदा देखील दिसणार आहे. या तिन्ही स्टार किड्सचे पदार्पण असेल. निर्मात्या रीमा कागतीने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. मात्र, कलाकारांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. ‘द आर्चीज’ असे या चित्रपटाचे नाव आहे.
जोया अख्तरने नोव्हेंबर २०२१ मध्ये या चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाचे शूटिंग उटी येथे होणार आहे. अगस्त्य यात आर्ची अँड्र्यूजची भूमिका साकारणार आहे. तर खुशी कपूर आणि सुहाना खान Betty आणि वैरोनिकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ती एका लोकप्रिय कॉमिक मालिकेवर आधारित आहे.
गेल्या काही वर्षांपासून सुहाना कधी पदार्पण करणार याची चर्चा सातत्याने होत होती. यासोबतच खुशी कपूरचे बॉलीवूड डेब्यूही सर्वांच्या मनात होते. आता मोठी बहीण जान्हवीप्रमाणेच खुशीही चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. सुहाना आणि खुशी यांची चांगली मैत्री आहे. दोघीही चित्रपटामध्ये दिसण्यापूर्वीच खूप लोकप्रिय आहेत आणि त्यांचा स्वतःचा चाहता वर्ग आहे. आता हे स्टारकिड्स प्रेक्षक वर्गावर आपली छाप सोडण्यात कितपत यशस्वी ठरतात, आता हे त्यांचा चित्रपट पाहिल्यानंतर कळेल.