शाहूपुरी रेल्वे फाटक परिसरात नोटा पडल्याचा बनाव करून मोटारीत बसलेल्या वृद्धाला टोळक्यािने बाहेर बोलावले. याच टोळीतील दुसऱ्या चोरट्याने नजर चुकवून बाजूच्या सीटवरील बॅग, मोबाईल पळवला. सोमवारी भरदिवसा घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
दिवसाढवळ्या ५ चोरटय़ांनी पाळत ठेऊन ही चोरी केली. चोरांनी २-३ वेळा गाडीभोवती फेऱ्या मारून या मोटारीत वृद्ध एकटेच आहेत. व कागदपत्रांची बॅग, मोबाईल सर्व साईड च्या सीटवर आहेत याची रेकी चोरट्यांनी केली. अशा प्रकारच्या चोऱ्या कोल्हापूर मध्ये भरदिवसा रहदारीच्या ठिकाणी होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.