ताजी बातमी ऑनलाइन टीम
रंकाळा टॉवर परिसरात दोन गटात धुमसत असलेला वाद सोमवारी (दि.२५) रात्री उशिरा उफाळून आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. दोन्ही गटाकडून दगडफेक आणि काचेच्या बाटल्यांचा मारा करण्यात आला त्यामध्ये दोघे जण जखमी झाल्याचे रात्री उशिरा पोलिसांनी सांगितले. यावेळी घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.
रंकाळा टॉवर परिसरात सोमवारी रात्री दोन वादवादी झाली. यानंतर दगडफेक होऊन रंकाळा टावर परिसर आणि खाऊ गल्लीत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गटात झालेल्या दगडफेकीमुळे जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांसह पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच जमाव पांगला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी रात्री उशिरा दोघांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर महिलांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती. ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. मात्र, परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.