Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगकोयना दुसर्‍या लेक टॅपिंगला दहा वर्षे पूर

कोयना दुसर्‍या लेक टॅपिंगला दहा वर्षे पूर

ताजी बातमी ऑनलाइन टीम
संपूर्ण जगात नवे आश्चर्य निर्माण करणार्‍या कोयना दुसर्‍या लेक टॅपिंगला दहा वर्षे पूर्ण झाली. भारतीय अभियंत्यांची कसोटी ठरलेल्या या लेक टॅपिंगमुळे कृष्णा खोरे विकास महामंडळाला सिंचनासाठी अतिरिक्त पाणी मिळाले. यामुळे उन्हाळ्यात बंद होणारी कोयना चौथ्या टप्प्यातील एक हजार मेगावॅट वीजनिर्मिती अखंडित ठेवण्यात यश आले. धरणातील पाण्याच्या थेंबा थेंबाचा सकारात्मक वापर झाल्याने महसुलात अब्जावधींची भरही पडली.



कोयना धरण हे पूर्वी 98.78 टीएमसीचे होते. त्यानंतर धरणाच्या दरवाजांची उंची वाढवत अत्यंत कमी खर्चात व पुनर्वसन कटकटीशिवाय ही साठवण क्षमता 105.25 टीएमसी करण्यात आली. कोयनेच्या पाण्यावर तत्पूर्वी धरणाच्या पोफळी, अलोरे, कोयना धरण पायथा वीजगृह यातूनच 960 मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येत होती. कोयना चौथा टप्प्यानंतर त्यासाठीचे पहिले लेक टॅपिंग 13 मार्च 1999 ला झाले.



मात्र, दुसरे लेक टॅपिंग हे तितकेच धाडसी व आव्हानात्मक होते. त्याचदरम्यान 2009 ला येथे कोयना अभ्यासक दीपक मोडक यांची मुख्य अभियंता म्हणून झालेली निवड यामुळे या आव्हानाला बळकटी मिळाली व तातडीने कामाला जोर आला. पुर्वीच्या बोगद्याला जोडणारा नवीन तीस फूट व्यासाचा साडेचार किलोमीटरचा अंतराचा हा बोगदा तयार करण्यात आला. ज्या ठिकाणी प्रत्यक्षात लेक टॅप करायचा अशा पाण्याखालील भागात तेवढ्याच साईजची खोल विहीर काढण्यात आली. जेणेकरून त्या स्फोटानंतर त्याठिकाणची दगड, माती ही त्या विहीरीत जावून बसेल आणि वरील भागातील पाणी हे नवीन बोगद्यातून जुन्या बोगद्याला मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -