ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आली आहे. या कारवाईत वाहतूक विभागाने अजित पवारांकडून सुमारे 27000 रुपयांचा दंड आकारला आहे. अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक नेते, मंत्र्यांवर देखील वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
मिळालेली माहिती अशी, की वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे केवळ अजित पवारच नाहीत तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil), राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ( Dattatray Bharne) यांचा देखील समावेश आहे. या नेते मंडळीवर देखील वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वाधिक दंड अजित पवार यांनी भरला आहे. अजित पवारांनी 27000 हजार रुपयांचा दंड भरला आहे. तर सगळ्यांना कायद्याचे पालन करा, असे आवाहन करणारे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 5200 रुपयांचा दंड भरला आहे. दुसरीकडे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 600 रुपये दंड आकारण्यात आला आहे.