ताजी बातमी ऑनलाईन टीम
पोलिस मुख्यालयाशेजारील पोलिस पेट्रोल पंपावर रात्री साडेबारा वाजता शंभर रुपयांचे पेट्रोल भरून पैसे न देताच पसार झालेल्या फाळकूटदादाला अटक करण्यात आली. पवन पप्पू सकट (रा. विचारे माळ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी पोलिस पेट्रोल पंप 24 तास सुरू ठेवण्यात येतो. 26 एप्रिलला रात्री साडेबाराच्या सुमारास संशयित पवन सकट या पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी आला. येथील कर्मचारी पृथ्वीराज गायकवाड याच्याकडून मोटारसायकलीमध्ये 100 रुपयांचे पेट्रोल भरून घेतले. यानंतर तो पळून जात असताना अडविण्याचा प्रयत्न केला असता कर्मचारी व काही पोलिसांनाही शिवीगाळ करून तो पसार झाला होता. शाहूपुरी पोलिसांनी त्याला शुक्रवारी अटक केली. तसेच त्याच्यासोबत आलेल्या एका अल्पवयीन मुलालाही नोटीस बजावली.
कोल्हापूर : पोलिस पंपावर पेट्रोल भरून पसार झालेल्या फाळकूटदादाला अटक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -