Sunday, July 27, 2025
Homeसांगलीमिरज :  खाजगी सावकाराच्यावर तक्रार करणाऱ्या फिर्यादिवर प्राणघातक हल्ला

मिरज :  खाजगी सावकाराच्यावर तक्रार करणाऱ्या फिर्यादिवर प्राणघातक हल्ला

मिरज / प्रतिनिधी
संजय मधुकर मिरजकर वय 47 राहणार पत्ता शनिवार पेठे सतारमेकर गल्ली  हे पीरजादे प्लॉट येथील जेके हॉल जवळून चालत जात असताना एका मोटरसायकल वरून आलेल्या दोघांनी कटर हत्याराने हल्ला करून संजय मिरजकर यांना जखमी केल्याची घटना घडली आहे.  तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी संजय सतारमेकर यांना लाथ मारून खाली पाडले आणि धारधार कटरने पाठीवर वार करून जखमी केले हल्ला केल्यानंतर दोघे हल्लेखोर मोटारसायकल वरून पळून गेले आहेत.

जखमी संजय मिरजकर यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे पाठीवर सहा ठिकाणी वार हल्लेखोरांनी केले अहे. याप्रकरणी संजय मिरजकर यांनी  संतोष कोळी,शंतनू कोळी जितेंद्र ढोले शैलेश ढोले विजय पाठगावकर  उदय गोरे सुरेश लांडगे , यांच्यावर विरोधात तक्रार दिली आहे 2019 रोजी या 7 जनांच्यावर  जखमी संजय मिरजकर यांनी खाजगी सवकारीचा गुन्हा दाखल केला होता याचा राग म्हणत धरून यांनी हल्ला केल्याची तक्रार  संजय मिरजकर यांनी केली आहे. याबाबत मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -