Monday, July 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : या ठिकाणाहून 11 लाखांचे दागिने लंपास

कोल्हापूर : या ठिकाणाहून 11 लाखांचे दागिने लंपास

गारगोटी येथील इंजुबाई कॉलनीतील घरातून दिवसाढवळ्या 11 लाख रुपये किमतीचे 21 तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. अमोल जनार्दन देसाई यांनी कार्यक्रमासाठी बुधवारी (दि. 11) बँकेच्या लॉकरमधून दागिने काढून बेडरूममधील टेबलवर ठेवले होते.

पाऊस आल्याने घराबाहेर वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी त्यांची आई साधना बाहेर गेल्या. त्याचवेळी चोरट्याने घरात प्रवेश करून आठ बांगड्या, दोन बिल्वर, दोन ब-सलेट, आठ अंगठ्या असा सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. गारगोटीत बुधवारी आठवडी बाजार असल्याने शहरात गर्दी होती. चोरट्यांनी बँकेपासून घरापर्यंत पाळत ठेवून सोने लंपास केल्याचा संशय आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -