Monday, December 23, 2024
Homeतंत्रज्ञान....तर तुम्हालाही व्हॉट्सअॅनपच्या ‘या’ सेवेचा मिळणार नाही लाभ

….तर तुम्हालाही व्हॉट्सअॅनपच्या ‘या’ सेवेचा मिळणार नाही लाभ

जगातील प्रत्येक कुटुंबातील लोक सध्या व्हॉट्सअॅचप (WhatsApp) वापरत आहेत, असं म्हणायला आता काही हरकत नाही. कारण या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने जगात आपला दबदबा कायम राखला आहे. यूजर्सचा विश्वास व सेवा यांमुळे आज व्हॉट्सअॅनप टॉपवर आहे. लोकांना अधिक पारदर्शक सुरक्षित सेवा देण्यासाठी व्हॉट्सअॅयप काही महत्त्वाचे बदल नेहमीच करत असतो. यांपैकी एक महत्वाचा बदल ते करत आहे.
व्हॉट्सअॅधप वापरणाऱ्या लोकांसाठी एक मोठी बातमी अशी आहे की, व्हॉट्सअॅीप युजर्स आपल्या प्रोफाईलमध्ये आपलं जे नाव टाकतात (Whatsapp User Name) तिथे त्यांना स्वतःचंच नाव टाकावं लागणार आहे.

काही व्हॉट्सअॅआप यूजर्स स्वतःचं नाव सोडून वेगवेगळी नावे टाकत असतात जे मजेदार, Attitude, पर्सनॅलिटी संबंधी किंवा त्यांच्या पाळीव प्राण्यांचंही नाव असतं. आजकाल king, Beauty Queen, अमुक तमुक Sheth वगैरे अशी नावं जास्त वापरली जात आहेत. पण आता तुम्हाला तसं करता येणार नाहीये.
आता व्हॉट्सअॅकप प्रोफाईलमध्ये तुम्हाला तुमचं खरं नाव टाकावं लागणार आहे जो ते व्हॉट्सअॅ्प वापरणार आहे. म्हणजेच त्या व्यक्तीचं यूजर नेम टाकावं लागणार आहे. याचा अर्थ असा की, सरकारी कागदपत्रांवर जे लिहिलंय तेच युजर्सला लिहावं लागणार आहे. यामुळे व्हॉट्सअॅकपवर यूजर्सचा विश्वास आणखी वाढेल आणी पारदर्शकता येईल.

समजा, जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्ही व्हॉट्सअॅशपच्या एका महत्त्वाच्या सेवेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. तुम्हाला खरं नाव टाकणं गरजेचं आहे. म्हणून तुमचं कायदेशीर नाव भरणं तुमच्यासाठी खूप आवश्यक असेल. अन्यथा तुम्ही WhatsApp पेमेंटचा लाभ घेऊ शकणार नाही. जर तुम्ही ही सुविधा वापरत असाल तर तुम्ही हे तेव्हाच करू शकाल जेव्हा युजरनेमच्या जागी तुमचे अधिकृत नाव लिहिलं जाईल आणि तसे न केल्यास तुम्हाला पेमेंट करता येणार नाही.

खरं नाव इतकं आवश्यक का..?
व्हॉट्सअॅतपने आपल्या वेबसाईटवर अधिकृतपणे सांगितलंय की, “ही आवश्यकता NPCI च्या नियमांच्या आधारे सेट केली गेली आहे. यासोबतच UPI पेमेंट सिस्टममधील फसवणूक कमी करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. UPI (Unified Payments Interface) द्वारे तुमचं बँक खातं व्हेरिफाय करण्यासाठी WhatsApp तुमच्या खात्याशी लिंक केलेला फोन नंबरचा वापर करते. “तुमच्या बँक खात्याशी संबंधित नाव व्हॉट्सअॅेपवरील हे नाव शेअर केले जाईल. हा बदल iOS आणि Android दोन्ही वापरकर्त्यांसाठी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -