Monday, July 7, 2025
Homeमनोरंजनदाढी-मिशीवरील विनोद भारती सिंगवर पडला भारी!

दाढी-मिशीवरील विनोद भारती सिंगवर पडला भारी!

दाढी-मिशीवर केलेल्या विनोदावरून कॉमेडियन भारती सिंग ही आता चांगलीच अडचणीत आली आहे. दाढी-मिशीच्या विनोदामुळे शिख समुदाय भारतीवर नाराज असून समुदायातर्फे तिच्या वक्तव्याचा तिव्र निषेध व्यक्त केला जात आहे. यावर भारती हिने हात जोडून माफी देखील मागितली आहे. मात्र, याचा काहीच उपयोग झाला नाही. या प्रकरणी अखेर भारतीच्या विरोधात IPC कलम 295-A प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?
भारतीच्या कॉमेडी शोमध्ये टीव्ही अभिनेत्री जॅस्मिन भसीन पाहुणी म्हणून आली होती. यावेळी भारतीने विनोद करत दाढी-मिशी का नको यावर संगितले की, दूध प्यायल्यानंतर दाढी तोंडात टाकली तर शेवयाची चव येते. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत, ज्यांचं नुकतेच लग्न झाले आहे. त्या सर्वजणी दिवसभर दाढी आणि मिशीतून उवा काढण्यात बिझी असतात. भारतीच्या या विनोदावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

हात जोडून मागितली माफी..
भारतीच्या विनोदाने शिख समुदायाच्या भावना दुखवल्याचे बोलले जात आहे. भारतीचा सर्वत्र विरोध केला जात आहे. प्रकरण अंगलट आल्याचे लक्षात येताच भारतीने आपल्या इस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत आपल्या वक्तव्याबद्दल तिने माफी मागितली आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमुळे वाद निर्माण झाला आहे. तो व्हिडिओ मी अनेकदा पहिला तुम्ही देखील तो व्हिडिओ बाघा. या व्हिडिओत आक्षेपार्ह काहीच नाही, असे यात भारतीने म्हटले आहे.

मी कधीही कोणत्या धर्म किंवा जातीबद्दल बोलले नाही. मी कधीच बोलले नाही की या धर्माचे लोक दाढी ठेवतात. हा प्रॉब्लेम होतो. मी पंजाबी लोकांसाठी नाही बोलले की ते दाढी ठेवतात आणि त्यामुळे अडचण निर्माण होते. मी साधारणपणे बोलून गेले. ही माझ्या मैत्रिणीसोबत केलेला विनोद होता. परंतु माझ्या या विनोदामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी हाता जोडून माफी मागते. मी स्वत: पंजाबी आहे. माझा जन्म अमृतसरमध्ये झाला. मी पंजाबी आहे, याचा मला अभिमान आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -