ताजी बातमी ऑनलाईन टीम
येथील पंचगंगा नदीकाठावरील श्री वरदविनायक मंदिर ते जॅकवेल दरम्यान आज सकाळी नदीत स्त्री जातीचा मृतदेह तरंगताना आढळला. मॉर्निंगवॉकसाठी गेलेल्या लक्ष्मीकांत सत्यनारायण पारीख (रा.पारीख कॉलनी) यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन मृतदेह पात्राबाहेर काढला. नातेवाईकाना मृतदेहाची ओळख पटली असून समीना रहीम हिप्परगी (वय २५, रा.रेंदाळ) असे तिचे नाव असल्याचे स्पष्ट झाले. हिप्परगी या २७ एप्रिल पासून बेपत्ता असल्याची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.