Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरतयारीला लागा; 13 महापालिकांच्या निवडणुकांसाठी 13 जूनला होणार आरक्षण सोडत!

तयारीला लागा; 13 महापालिकांच्या निवडणुकांसाठी 13 जूनला होणार आरक्षण सोडत!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुंबई : राज्यातील निवडणूक रखडलेल्या पालिकांसाठी आता महत्वाची बातमी आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. तर राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) राज्यातील प्रलंबित 13 महानगरपालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत काढण्याचे अधिसूचना जाहीर केली आहे. त्यामुळे नवी मुंबई, वसई-विरारसह 13 महानगरपालिकांच्या निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम येत्या 31 मे 2022 रोजी होणार आहे. आगामी काळात नवी मुंबई, वसई-विरार, कल्याणडोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.



काहीच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात (local body elections) सुनावणी झाली होती. त्यावेळी राज्य निवडणूक आयोगाला राज्यात जेथे पाऊसाचे प्रमाण कमी आहे तेथे निवडणूक घेण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळं ओबीसी निर्देश देण्यात आले. त्यामुळं ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -