ताजी बातमी ऑनलाईन टीम
सिनेमा जगतात सध्या दुर्दैवी घटना पाहायला मिळताहेत. अभिनेत्री बिदिशा आणि पल्लवी डे च्या निधनाचे वृत्त ताजे असताना आता आणखी एक बंगाली अभिनेत्रीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी सकाळी २७ मे रोजी अभिनेत्री मॉडल मंजूषा नियोगीने (Manjusha Niyogi) आत्महत्या केली. तिचा मृतदेह तिच्या फ्लॅटवर लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.
लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह अभिनेत्री पल्लवी डे आणि मॉडल बिदिशा डेचं निधन झालं होतं. फॅन्सना हा मोठा धक्का होता. या धक्क्यातून सावरत नाही तोपर्यंत आणखी एका बंगाली अभिनेत्रीच्या मृत्यूचे वृत्त येऊन धडकले. शुक्रवार २७ मे च्या सकाळी अभिनेत्री मॉडल मंजूषा नियोगीचं निधन झालं.