ताजी बातमी ऑनलाईन टीम
परवाना वाटप खुले करण्यात आले. त्यामुळे 2017 पासून मागेल त्याला रिक्षाचा परवाना मिळत आहे. मात्र आता लवकरच खुला रिक्षा परवाना धोरण बंद होण्याची शक्यता आहे. याबाबत पुणे आरटीओकडून (Pune RTY शासनाला एक ठराव देण्यात आला होता. या ठरावात खुला रिक्षा परवाना धोरण बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. या ठरावाला मंजुरी मिळाली आहे.
आता येत्या काही दिवसांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होऊन खुला रिक्षा परवाना धोरण संपुष्टात येऊ शकते. पुण्याची लोकसंख्या प्रचंड मोठी आहे. शहरात वाहनांची संख्या देखील प्रचंड आहे. खासगी वाहनातून प्रवास करताना अनेकदा वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे सध्या तरी पुणेकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाचा प्राधान्य देताना दिसून येत आहेत.
अनेक जण खासगी वाहनांऐवजीसार्वजनिक वाहनातून प्रवास करतात. सार्वजनिक वाहनांमध्ये महापालिकेच्या बस, ओला, उबेर आणि रिक्षा अशा वाहनांचा समावेश होतो. पुण्यात सार्वाजनिक वाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने रिक्षांची संख्या झपाट्याने वाढली.