ताजी बातमी ऑनलाईन टीम
पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व गायक सिद्धू मुसेवाला यांची आज भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राज्यातील आप सरकारने सिद्धू मुसेवालासह ४२४ लोकांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर केवळ ४८ तासांमध्ये ही घटना घडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
गोळीबारात जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयात आणण्यात आले होते, त्यापैकी सिद्ध मुसेवाला यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता, अशी माहिती मानसा हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन डॉ रणजीत राय यांनी दिली.
मानसातून विधानसभा निवडणूक लढवली मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा मतदारसंघातून
विधानसभा निवडणूक लढवली होती. आम आदमी पक्षाचे डॉ. विजय सिंगला यांनी त्यांचा ६३,३२३ मतांनी पराभव केला होता