Monday, July 28, 2025
Homeराजकीय घडामोडीब्रेकींग न्यूज: मनसे अध्यक्ष राज ठाकरे रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?

ब्रेकींग न्यूज: मनसे अध्यक्ष राज ठाकरे रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (मंगळवार) लीलावती रूग्‍णालयात दाखल झाले. गेल्‍या काही दिवसांपासून पायांच्या दुखण्यामुळे ते त्रस्‍त असल्याने त्यांच्यावर बुधवारी (ता. 1 जून) शस्‍त्रक्रिया होणार असून, आज काही वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी ते रूग्‍णालयात दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहीतीनुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया करण्यात येणार असून शस्त्रक्रिया झाल्यापासून पुढील कमीत कमी दोन महिने त्यांना आराम करावा लागणार आहे, अशी माहीती आहे. आज ते रुग्णालयात दाखल झाले आहेत यावेळी पत्नी शर्मिली ठाकरे व अमित ठाकरे त्यांच्यासोबत आहेत. राज ठाकरेंनी अयोध्या दौरा जाहीर केल्‍यानंतरही त्‍यांना पायाचे दुखणे वाढू लागल्‍याने त्‍यांनी दौरा स्‍थगित केला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हिप बोनची शस्‍त्रक्रिया होणार असल्याची माहीती आहे. असं सांगण्यात येतंय की, काही दिवसांपूर्वी टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला ही दुखापत झाली होती. पायाचे दुखणे वाढल्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता.

आता राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी काही आवश्यक वैद्यकिय चाचण्यांसाठी ते आज लीलावती रूग्‍णालयात दाखल झालेत. राज ठाकरेंच्या पायाचे दुखणे वाढल्‍याने अयोध्या दौरा स्‍थगित केल्‍याच्या बातम्‍या लागल्‍या होत्‍या. पायाचे दुखणे वाढल्यामुळे आणि त्रास सहन न झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.

काही दिवसांपासून राज्यात भलतंच राजकारण तापलं आहे. अनेक मुद्द्यांवर राज ठाकरे आवाज उठवताना दिसत आहेत. पायाचे दुखणे अचानक जास्त होत असल्याने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया होण्याच्या चर्चा पसरल्या होत्या. पण काही दिवसांपासून पायाचे दुखणे आणखी वाढल्याने त्यांना एक दिवस अगोदर रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. त्यानुसार आज ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबीयांसह मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -