कोगनोळी येथील तलाठी कार्यालयात कोगनोळी तलाठी के एल पुजारी यांच्या हस्ते पेन्शन पत्रांचे वितरण करण्यात आले.
तलाठी के एल पुजारी म्हणाले, नागरिकांनी आपल्या मोबाईल नंबर वरून 15 52 45 या नंबर वरती पेन्शन रजिस्टर करणे या नंतर आधार कार्ड, 32 हजाराच्या आतील उत्पन्न दाखला बँक पासबुक आदी कागदपत्रे तलाठी कार्यालयात आणून दिल्यानंतर 72 तासाच्या आत नागरिकांना पेन्शन सुविधा उपलब्ध होते. या शासनाच्या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा. विधवा, इंदिरा गांधी, संध्या सुरक्षा, अपंग पेन्शन सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत.
याठिकाणी भारती तुकाराम दुधाने, बाबासाहेब राजाराम माने यांच्या पेन्शन पत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनिल माने, कुमार व्हटकर, शिवाजी पंढरे, भीमराव पाटील, अनिल कोळेकर, दत्तात्रय जगदाळे, बबलू पाटील, राहुल आक्कोळे, संतोष पाटील, अनिल पाटील यांच्यासह अन्य मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.
कोगनोळी : पेन्शन पत्राचे वितरण प्रसंगी तलाठी के एल पुजारी, सुनील माने, कुमार व्हटकर व इतर