Sunday, December 22, 2024
Homeदेश विदेशप्रेमाखातर बांगलादेशातून जगातील सर्वात लांब नदी पोहून आली 'ही' तरुणी

प्रेमाखातर बांगलादेशातून जगातील सर्वात लांब नदी पोहून आली ‘ही’ तरुणी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

22 वर्षीय बांगलादेशी तरुणीने भारतात आपले प्रेम शोधण्यासाठी जगातील सर्वात लांब नदी सुंदरबन डेल्टा पार केली. मुलगा आणि मुलगी दोघांचेही लग्न झाले पण पूढे घडलेल्या घटनेने दोघेही दु:खी झाले आहेत. ‘ अशी झाली सुरुवात मुलीचे नाव कृष्णा मंडल असून तिची भारतातील अभिक मंडलसोबत फेसबुकवर मैत्री सुरू झाली.



काही वेळातच त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आता कृष्णाने अभिला भेटायचे ठरवले. कृष्णाकडे पासपोर्ट नसल्याने त्याने बेकायदेशीरपणे सीमा ओलांडणे पसंत केले. ‘पुढे काय झाले पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णाने सर्वप्रथम सुंदरबन डेल्टामध्ये प्रवेश केला. सुंदरबन डेल्टा रॉयल बंगाल टायगर्ससाठी ओळखला जातो. पण त्याची पर्वा न करता कृष्णाने तासभर डेल्टा ओलांडला.



3 दिवसांपूर्वी कोलकाता येथील कालीघाट मंदिरात कृष्णाने अभिसोबत लग्न केले. मात्र, कृष्णाला सोमवारी बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून तिला बांगलादेश उच्चायुक्तांकडे सोपवले जाणार आहे. यामुळे मुलगा आणि मुलगी दोघे ही दुःखी झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -