Thursday, July 31, 2025
Homeब्रेकिंगवारीच्या मार्गावरील मासांहाराची दुकाने आणि दारुची दुकाने वारीकाळात बंद ठेवणार?

वारीच्या मार्गावरील मासांहाराची दुकाने आणि दारुची दुकाने वारीकाळात बंद ठेवणार?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर यंदा आषाढी वारीचा सोहळा भक्तीभावाने मोठ्या उत्साहात पार पडणा असं दिसत होतं. मात्र, आता पुन्हा एकदा राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसाला 1 हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.



अशावेळी यंदाच्या आषाढी वारीवरही कोरोनाचं सावट असणार का? असा प्रश्न विचारला जातोय. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी अजित पवार यांच्यासमोर पालखी मार्गांचं वेळापत्रक सादर करण्यात आलं. तसंच पालखी मार्गात कोणकोणत्या सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याचीही माहिती अजित पवारांना देण्यात आलीय. महत्वाची बाब म्हणजे वारीच्या मार्गावरील रस्त्याच्या बाजूची मांसाहाराची, दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश देण्यात येण्याची शक्यता आहे.


अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीला आळंदी देवस्थानचे अध्यक्ष विकास ढगे, देहू संस्थांचे अध्यक्ष नितीन मोरे यांच्यासह विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर हे देखील या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर ज्या तीन जिल्ह्यातील पालखी मार्ग जातो त्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेही या बैठकीत सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -