Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : परप्रांतीय तरुणांनी ओढला रंकाळा चौपाटीवरहुक्का

कोल्हापूर : परप्रांतीय तरुणांनी ओढला रंकाळा चौपाटीवरहुक्का

कोल्हापूर शहराचे वैभव आणि शहराच्या सौंदर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या रंकाळ्यावर काल काही परप्रांतीय तरुणांनी खुलेआमपणे हुक्का पार्टी केली. तिथे आलेल्या पर्यटकांची किंवा शहरवासीयांची तमा न बाळगता हे तरुण हुक्का ओढत राहिले. त्यामुळे अशा परप्रांतीयांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शहरात अंबाबाई मंदिरासह सर्वच पर्यटस्थळांना भेट देण्यासाठी
रोज लाखो लोक कोल्हापूरमध्ये येतात. आल्यावर ते रंकाळा चौपाटीवर फेरफटका मारतात. काल (ता. ४) रंकाळ्यावर मोठी
गर्दी होती. स्थानिकांसह इतर जिल्ह्यांतील आणि राज्यातील लोकही येथे आले होते. मात्र, कामानिमित्त कोल्हापुरात असणारे काही परप्रांतीय तरुणांनी चौपाटीवर हुक्का पेटविला आणि हुक्क्याची नळी तोंडाला लावून धुराचे लोट सोडू लागले.
हा सर्व प्रकार तिथे असणारे नागरिक पाहत होते.

फोनवर कोणाशी तरी बोलणे, जोर-जोराने हसणे हे प्रकार सुरूच राहिले. स्थानिक लोकांनी त्यांचे फोटोही काढले. ते सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. शहरात आणि रंकाळा चौपाटीवरच हुक्का पार्टी करणारे तरुण पाहून अनेकांना धक्का बसला. कोणीतरी बाहेरचे लोक येतात आणि कोल्हापूर शहरातील सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात, अशांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.

हुक्का ओढणाऱ्यांवर तत्काळ आणि कडक कारवाई केली जाईल. असे हुक्का ओढणारे दिसल्यास ११२ नंबरवर तत्काळ माहिती द्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -