ताजी बातमी ऑनलाईन टीम
पंजाबी गायक सिद्ध मुसेवाला खून प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रातील कुख्यात गुंड अरुण गवळी (Arun Gavali) टोळीशी जोडले गेले आहेत. पंजाब पोलिसांनी ओळखलेल्या 8 शार्प शूटर्सपैकी संतोष जाधव हा गवळी टोळीचा हस्तक असल्याचे सांगितले जात आहे. संतोष जाधव हा पुण्याचा रहिवासी असून 29 मे रोजी मुसेवालावर गोळी झाडण्यात आली त्यामध्ये त्याचा सहभाग होता अशी माहिती देण्यात आली आहे.
मुंबईहून पंजाबला संतोष जाधवला बोलावून घेण्यात आले होते. तर त्याच्यासोबत महाराष्ट्रातील सौरभ महाकाळही आला होता. ही धक्कादायक माहिती दिल्यानंतर पंजाब पोलिसांनी या घटनेची सविस्तर माहिती देण्यात आी असून त्यांनी मुंबई पोलिसांकडून सहकार्य मागितले आहे. पंजाब पोलिसांनी या घटनेची माहिती पुणे पोलिसांना देण्यात आल्यानंतर संतोष जाधवचा शोध सुरु झाला आहे.