Monday, December 23, 2024
Homeसांगलीसांगली :देवदर्शनाहून परतताना भाविकांवर काळाचा घाला!

सांगली :देवदर्शनाहून परतताना भाविकांवर काळाचा घाला!

रत्नागिरी-नागपूर महामार्ग क्रमांक १६६ वर कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाट्याजवळ पंढरपूर, तुळजापूर येथे देवदर्शन करून कोल्हापूरला जोतिबा दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची भरधाव मोटार रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकवर (truck) आदळून झालेल्या भीषण अपघातात मोटारीतील दोघे ठार झाले, तर महिलेसह चालक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजता घडली. दोघेही मृत माण (जि. सातारा) तालुक्यातील काळसकरवाडीचे आहेत.

आनंदराव शिवराम पवार (वय ६८) व माणिक साहेबराव पवार (६२) अशी मृतांची नावे आहेत, तर उषाताई आनंदराव पवार (५४) व मोटारचालक स्वप्नील आनंदराव पवार (२६) हे दोघे गंभीर जखमी झाले.

काळसकरवाडी येथील पवार कुटुंब मोटार (क्र. एमएच ११ डीए ७६५८) घेऊन देवदर्शनासाठी निघाले होते. तुळजापूर व पंढरपूर येथे दर्शन घेऊन ते कोल्हापूरला जोतिबा दर्शनासाठी निघाले होते. पंढरपूरमधून दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर नव्यानेच झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरून ते कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. स्वप्नील पवार हा मोटार चालवित होता. दुपारी १ वाजण्याच्यादरम्यान त्यांची मोटार नागज फाट्याजवळ आली. यादरम्यान कांदा घेऊन निघालेला (truck) ट्रक (क्र. एमएच २३ – ७२७०) रस्त्याकडेला उभा होता. भरधाव वेगाने येत असलेल्या पवार यांच्या मोटारीने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागील बाजूला जोरदार धडक दिली. अपघातात मोटारीचा अक्षरश: चक्काचूर झाला. मोटारीतील चौघेही रक्तबंबाळ झाले. गंभीर जखमी झालेल्या आनंदराव पवार व माणिक पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर आनंदराव यांच्या पत्नी उषाताई व मुलगा स्वप्नील हे दोघे गंभीर जखमी झाले.

घटनास्थळी धावलेल्या नागरिकांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी पाठवून दिले. अपघाताची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांचे पथक घटनास्थळी धावले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी गर्दी हटवून वाहतूक सुरळीत केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे, हवालदार सतीश आलदर, पोलीस विनोद चव्हाण यांनी पंचनामा केला. कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -