Sunday, February 23, 2025
Homeजरा हटकेभिंतींना ओल येऊ नये म्हणून पावसाळ्याआधीच घरात 'हे' उपाय करा

भिंतींना ओल येऊ नये म्हणून पावसाळ्याआधीच घरात ‘हे’ उपाय करा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पावसाळा(Rainy season) म्हटलं की जितका सुखद गारवा अनुभवयाला मिळतो तितक्याच समस्यांना देखील सामोरं जावं लागतं. पण पावसाळ्याची पूर्वतयारी तुम्ही करुन ठेवली की अनेक अडचणी दूर होतात किंवा त्रास कमी होतो.



पावसाळ्यात अशीच एक हमखास निर्माण होणारी समस्या म्हणजे भिंतींना ओल येणं. पावसाचं पाणी घराच्या भिंतींमध्ये झिरपलं की भिंतींना ओल पकडते आणि तुम्ही भिंतीला दिलेल्या रंगाची पूर्ण वाट लागते. रंगाचे आणि प्लास्टरचे पोपडे पडण्यास सुरुवात होते. पण भिंतींना ओल पकडल्यामुळे फक्त त्या खराब होतात असं नाही तर त्यात किड निर्माण झाली की आणखी मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं.



तुमच्याही घरच्या भिंतींना जर पावसाळ्यात ओल धरत असेल तर त्याकडे वेळेआधीच लक्ष देणं खूप गरजेचं आहे. घर मूळात भिंतींनी बनतं आणि तुमच्या घराच्या भिंतींची जर काळजी घेतली नाही तर कसं चालेल? आता पावसाळा(Rainy season) जवळ आला आहे. त्यामुळे भिंतींना ओल पकडण्याच्या समस्येवर उपाय करण्याची हीच ती योग्य वेळ आहे.

भिंतींना ओल येण्यामागची कारणं आधी आपण जाणून घेऊयात. पावसाचं पाणी जर बाहेरुन सारखंच भिंतींवर पडत राहीलं तर भिंती ओल्या होतात. कधी कधी घराच्या छतांवर पाणी साचतं आणि ते भिंतींमध्ये झिरपून भिंती ओलसर होतात. यामुळे भिंती आणि दरवाजांनाही तडे जातात.,

घरातील पाइपिंगमध्ये गळती लागली असेल म्हणजेत घरात पाणी पुरवठा करणारा किंवा ड्रेनेजचा एखाद्या पाईपला गळती लागली असेल तर भिंती ओल्या होतात. त्यामुळे घरातील पाइपिंगची व्यवस्था तपासून घ्या आणि काही त्रुटी असतील तर त्या दुरूस्त कराव्यात. तसंच छतावर पडणारं पावसाचं पाणी वाहून नेणारे पाईप देखील एकदा पावसाळ्याआधी तपासून पाहावेत. उन्हाळ्यामुळे प्लास्टिक पाईपना तडे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे भिंतींचं नुकसान होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -