Saturday, July 26, 2025
Homeसांगलीमिरज : गुंडेवाडीत एकास मारहाण; पाच जणांवर गुन्हा

मिरज : गुंडेवाडीत एकास मारहाण; पाच जणांवर गुन्हा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गुंडेवाडी (ता. मिरज) येथे वैभव विजयकुमार हजारे यांना पाच जणांनी पाईप व काठीने बेदम मारहाण केली. या प्रकरणी वैभव हजारे यांनी शीतल विठ्ठल पाटील, सागर विठ्ठल पाटील, पांडुरंग विठ्ठल पाटील, तानाजी उर्फ पिंटू सदाशिव ढंग, बाळासाहेब सदाशिव ढंग (सर्व रा. मालगाव, ता. मिरज) यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.



वैभव हजारे यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे सासरे सुखदेव ढंग यांच्या घरासमोर एक कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी सर्व संशयित त्या ठिकाणी आले. त्यापैकी शीतल पाटील याने ‘बापू कुठे आहेत’, असे विचारले. त्यावेळी ‘बापू बाहेर गेले आहेत’, असे सांगताच सर्वांनी पाईप आणि काठीने बेदम मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -