Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगमोठी दुर्घटना : या ठिकाणी इमारतीचा काही भाग कोसळला, अनेक जण इमारतीत...

मोठी दुर्घटना : या ठिकाणी इमारतीचा काही भाग कोसळला, अनेक जण इमारतीत अडकल्याची भीती

नवी मुंबईत एक मोठी दुर्घटना घडली आहे. नवी मुंबईतील जिमी पार्क इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. इमारतीमधील काही भाग कोसळून सहाव्या मजल्यापासून ते थेट तळमजल्यापर्यंत आला आणि एक मोठं भगदाड पडल्याचं पहायला मिळालं.

या दुर्घटनेनंतर इमारतीत काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नेरूळ (Nerul Navi Mumbai) येथील शनीमंदिर जवळ जिमी पार्क नावाची इमारत आहे. त्या इमारतीमधील एका बाजूचा संपूर्ण भाग कोसळळा आहे. सहाव्या मजल्यापासूनचा भाग कोसळून तळ मजल्यापर्यंत आला.

एक प्रकारे इमारतीला भगदाडच पडल्याचं दिसून येत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच नेरूळ अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाकडून मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे. इमारतीत अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

इमारीतमधून आतापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी चार जणांना सुखरुप बाहेर काढले आहे. अद्यापही बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. ही संपूर्ण इमारत रिकामी करण्याचं काम सुरू आहे. इमारतीचा भाग कोसळून घडलेल्या या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी सुद्धा घटनास्थळी बघ्यांनीही मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊन 48 तास उलटले नाही तोवर इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडली. यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आणि शुक्रवारी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसला.

त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी नवी मुंबईत दुर्घटना घडली आहे. पावसाळ्यात इमारत कोसळणे, इमारतीचा भाग पडण्याच्या घटना वारंवार घडत असतात. पण आता पहिल्या पावसातच नवी मुंबईत इतकी मोठी दुर्घटना घडल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -