कोकणसह (Konkan Rain)आता संपूर्ण राज्यात मान्सून सक्रीय होणार आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिसाला मिळणार आहे. शनिवारी मराठवाड्यातील (Marathwada news) काही जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. परंतु वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात 2 आणि जालना जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे. इतर तिघे जखमी झाले आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, मुंबईसह (Mumbai Rain) महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. पुढील 48 तासांत आणखी पावसाची प्रगती दिसून येईल. राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे.
मुंबई, ठाणे, पुण्यासह कोकण आणि आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासांत मान्सूनची आणखी वेगाने प्रगती होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.