अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याला बेंगळुरू पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणी (drug abuse) ताब्यात घेतलं आहे. रविवारी रात्री बेंगळुरूमध्ये झालेल्या एका पार्टीत त्यानं ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप आहे. एम. जी. रोडवरील एका हॉटेलमध्ये ड्रग्जचा वापर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी त्या हॉटेलवर छापा टाकला. ड्रग्जचं सेवन केलं की नाही हे तपासण्यासाठी तिथल्या काही जणांची चाचणी करण्यात आली. यावेळी इतर सहा जणांसोबत श्रद्धा कपूरच्या भावाचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. त्यांनी आधीच ड्रग्जचं सेवन करून हॉटेलमध्ये प्रवेश केला की हॉटेलमध्ये आल्यानंतर ड्रग्ज घेतलं, हे अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत असताना बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं. यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांची नावं उघड झाली होती. त्यावेळी श्रद्धा कपूरसह, रकुल प्रीत सिंग,
दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीय सिंग यांच्यासह अनेक कलाकारांची एनसीबीने गेल्या वर्षी चौकशी केली होती. पण पुढे त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
सुशांतची माजी मॅनेजर जया साहा हिने एनसीबीकडून होणाऱ्या चौकशीत मोठा खुलासा केला होता. अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन सीबीडी ऑईल मागवल्याची कबुली तिने दिली होती. एनसीबीने चौकशीदरम्यान तिचे श्रद्धासोबतचे व्हॉट्सअॅप चॅट्स दाखवले होते आणि सीबीडी ऑईलबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर ते चॅट खरे असून श्रद्धा कपूरला सीबीडी ऑईल पुरवल्याची कबुली जयाने दिली होती.