ताजी बातमी ऑनलाईन टीम
संतोष जाधव हा मोक्का गुन्ह्यात काही महिन्यांपासून फरार होता. त्याचा शोध पुणे ग्रामीण पोलीस घेत होते. सिद्ध मुसेवाला याच्या खूनानंतर संतोष जाधव, सौरभ महाकाल यांचा त्यात सहभाग असल्याचा मीडिया रिपोर्ट आला.
याप्रकरणी आता नवनाथ सूर्यवंशी यालाही अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सरंगल यांनी दिली आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, की संतोष जाधव, सौरभ महाकाल, नवनाथ सूर्यवंशी या तिघांचे लॉरेन्स बिष्णोई गँगसोबत संबंध आहेत. या तिघांना मुसेवाला खुनासंदर्भात माहिती होती, असे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सरंगल यांनी सांगितले. त्याचबरोबर तेजस शिंदे हा संतोष जाधवचा मित्र आहे, त्याचा शोध घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.