Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगवाहनधारकांना मिळणार घरपोच ‘सीएनजी’ गॅस, सरकारचा मोठा निर्णय..!

वाहनधारकांना मिळणार घरपोच ‘सीएनजी’ गॅस, सरकारचा मोठा निर्णय..!

गेल्या काही दिवसांत इंधन दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ग्राहकांचा कल ‘सीएनजी’ वाहनांकडे वळला आहे.. ‘सीएनजी’ वाहनांची संख्या वाढत असली, तरी त्या प्रमाणात गॅस भरण्यासाठी आवश्यक केंद्रे झालेली नाहीत. त्यामुळे गॅस भरताना वाहनधारकांना तास न् तास ताटकळत बसावे लागत होते..

या पार्श्वभूमीवर राज्यातील वाहनधारकांसाठी आता मोठी बातमी समोर येत आहे.. ‘सीएनजी’ भरण्यासाठी तुम्हाला कार घेऊन केंद्रावर जाण्याची गरज नाही, तर आता ‘सीएनजी’च तुमच्या दारी येणार आहे.. त्यामुळे ‘सीएनजी’ वाहन असणाऱ्यांना अगदी ‘व्हीआयपी’ सुविधा मिळणार आहे.

वाहनधारकांच्या एका काॅलवर ‘सीएनजी’ पंप तुमच्या घराजवळ येऊन तुमच्या वाहनात सीएनजी (CNG) गॅस भरणार आहे. दिवस असो वा रात्र.. आठवड्यातील सातही दिवस व 24 तास ही सेवा वाहनधारकांना मिळणार आहे.. त्यासाठी मोबाईल ‘सीएनजी’ स्टेशन उभारले जाणार आहेत.

देशात सध्या प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातील मुंबईतून या सुविधेची सुरूवात होत आहे. मुंबईत ही सेवा सुरु करण्यासाठी ‘एनर्जी स्टार्टअप’ कंपनी ‘फ्युअर डिलिव्हरी’ (Fuel Delivery)ने ‘महानगर गॅस लिमिटेड’ (Mahanagar Gas) सोबत करार केला आहे. या करारानुसार शहरात ठिकठिकाणी ‘मोबाईल सीएनजी स्टेशन’ उभारले जाणार आहेत.

‘सीएनजी’वर चालणाऱ्या टॅक्सी, रिक्षा, खासगी व व्यावसायिक वाहने, शालेय बसचालकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आपात्कालीन परिस्थितीत ग्राहकांना घरपोच ‘सीएनजी’ उपलब्ध होणार असल्याने ‘सीएनजी’ स्टेशनवर लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगांमधून नागरिकांची सुटका होणार आहे.

याबाबत ‘फ्युअल डिलिव्हरी’तर्फे निवेदन जारी करण्यात आलंय. त्यात म्हटलंय, की वाहनचालकांना आता ‘सीएनजी’ भरण्यासाठी पंपावर जाण्याची गरज नाही. शिवाय तेथे रांगेत वाटही पाहावी लागणार नाही. मुंबईत दोन ठिकाणी ‘सीएनजी मोबाईल स्टेशन पंप’ सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे.

पुढील 3 महिन्यात मुंबईत ही सुविधा सुरु केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ‘सायन’ व ‘महापे’ या ठिकाणी ‘सीएनजी तुमच्या दारी’ येईल. त्यानंतर हळूहळू संपूर्ण मुंबई शहरात व नंतर देशभर हळुहळू या सेवेचा विस्तार केला जाणार आहे.. पेट्रोलियम व एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनकडून या सेवेस मंजुरी मिळाल्यानंतर कंपनीने पहिली यशस्वी चाचणी घेतली.

मुंबई शहरात रोज सुमारे 5 लाख ‘सीएनजी’ वाहने धावतात. त्यासाठी दरवर्षी 43 लाख किलो ‘सीएनजी’चा वापर होतो. दुसरीकडे या शहरात केवळ 223 ‘सीएनजी स्टेशन’ आहेत. त्यामुळे ‘मोबाईल सीएनजी स्टेशन’ सुरू झाल्यानंतर लाखो वाहनधारकांची सोय होणार, हे नक्की..!

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -