Sunday, July 27, 2025
Homeसांगलीसांगली : हजाराची लाच घेताना सहाय्यक उपनिरीक्षक जाळ्यात

सांगली : हजाराची लाच घेताना सहाय्यक उपनिरीक्षक जाळ्यात

वडाप रिक्षावरील कारवाई टाळण्यासाठी हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रविशंकर रामचंद्र चव्हाण (वय 53, रा. खणभाग सांगली) यांस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगहात पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी की, महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नेमणुकीस असणारे सहाय्यक उपनिरीक्षक रविशंकर चव्हाण यांनी वडाप रिक्षावर कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दि. 10 मे रोजी हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार पडताळणी केली असता चव्हाण यांनी हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानुसार बुधवार दि. 15 रोजी सायंकाळी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या बाहेर ट्रॅप लावण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे चव्हाण हे तक्रारदार यांच्याकडे आले. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडून वडाप रिक्षावरील कारवाई टाळण्यासाठी हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले. सहाय्यक उपनिरीक्षकच जाळ्यात सापडल्याने पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -