ताजी बातमी ऑनलाईन टीम
‘यही समय है सही समय है भारत का अनमोल समय है असे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या जोशपूर्ण कवितेचा उल्लेख करुन तुम्हाला कांही करुन दाखवायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे, आत्ता नाही तर कधीच नाही असे श्रीमती. दर्शना जरदोश, रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री, भारत सरकार यांनी युवापिढीला आवाहन केले.
डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजी यांचे मार्फत दिनांक १६ जून २०२२ रोजी ‘अॅन इंटरॅक्शन सेशन विथ टेक्स्टाईल स्टॅक होल्डर्स’ – परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती. दर्शना जरदोश, रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री, भारत सरकार उपस्थित होत्या. तसेच मा.श्रीमती. रुपराशी – टेक्स्टाईल कमिशनर, भारत सरकार, श्रीमती. उषा पोळ – डेप्युटी डायरेक्टर, जनरल टेक्स्टाईल कमिशनर ऑफीस, एस.पी. वर्मा – जॉईंट टेक्स्टाईल कमिशनर, सिरसेंदू मुखर्जी – ब्रँच मॅनेंजर, ईसीजीएस, पुणे, कल्लाप्पाण्णा आवाडे – अध्यक्ष, डीकेटीई सोसायटी, आमदार प्रकाशआण्णा आवाडेे – उपाध्यक्ष, डीकेटीई सोसायटी, स्वप्निल आवाडे – संचालक, गारमेंट क्लस्टर, डॉ राहूल आवाडे-जिल्हा परिषद सदस्य, प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले – संचालक डीकेटीई सोसायटी, सुनिल पाटील – व्हाईस चेअरमन ऑफ पीडीएक्सेल यांचेबरोबरच वस्त्रोद्योगातील उदयोजक, तज्ञ, बँक अधिकारी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत कापडावर सिल्व्हर जॅकार्ट ने विणलेल्या माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचा फोटो व त्याबरोबर त्यांचे ब्रिद वाक्य आणि स्वाक्षरी असलेल्या फोटो फे्रम देवून करण्यात आले.
आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात इचलकरंजीला शटललेस नगरीबरोबरच देशातील नंबर एकची एक्स्पोर्ट नगरी बनविण्याचे स्वप्न येत्या पाच वर्षात पूर्ण करु असा विश्वास व्यक्त केला, त्यासाठी सरकार कडून सर्वतोपरी सहाय्य मिळावे अशी आशा व्यक्त केली.
श्रीमती.
दर्शना जरदोश यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारने राबविलेल्या विविध योजनांचा उल्लेख करत नवउद्योजकांना पुढाकार घेवून देशासाठी कार्य करावे व व्हॅल्यूचेन मधील पाच-एफ चा उल्लेख करत माळेतील मोत्यांप्रमाणे एकत्र कार्य करुन मोदी सरकारचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करावे असे आवाहन केले. त्या म्हणाल्या, पूर्वी कामे करुन घेण्यासाठी दिल्लीला जायला लागायचे आता दिल्ली तुमच्या दारात आली आहे. तसेच वस्त्र उद्योजकांच्या विविध समस्या जाणून घेवून त्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही.कडोले यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
डीकेटीईमध्ये आयोजित परिसंवादावेळी इचलकरंजीतील समीर नाईक यांनी जकार्ट लूम वरती साकारलेली मा.पंतप्रधान मोदीजी व वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांची प्रतिमा प्रदान करीत असताना वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश, खासदार संजयकाका पाटील, आमदार प्रकाश आवाडे, टेक्स्टाईल कमिशनर रुप राशी व इतर मान्यवर