Thursday, February 19, 2026
Homeइचलकरंजीसाध्या यंत्रमागांचा खडखडाट मंदावला; इचलकरंजीतील ७० टक्के कारखान्यांत एकच शिफ्ट सुरू; कापड...

साध्या यंत्रमागांचा खडखडाट मंदावला; इचलकरंजीतील ७० टक्के कारखान्यांत एकच शिफ्ट सुरू; कापड साठा वाढला

कापडाला अपेक्षित मागणी येत नसल्यामुळे साध्या यंत्रमाग उद्योगावर अवकळा पसरली आहे. सध्या शहरातील ७० टक्के साध्या यंत्रमाग कारखान्यांत एकच शिफ्ट सुरू आहे. मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

 

यामध्ये पुढील काळात सुधारणा न झाल्यास साध्या यंत्रमागाची धडधड कमी होत जाण्याची शक्यता आहे.

 

कापडाला अपेक्षित दर नाही

 

वस्‍त्रोद्योगात सध्या मंदीचे वारे आहे. कापडाला अपेक्षीत मागणी व दर आलेला नाही. देशातील महत्त्वाच्या शहरातील कापड व्यापाऱ्यांनी अद्याप कापड खरेदीचे सौदे सुरू केलेले नाहीत. त्यामुळे उत्पादीत कापडाचा साठा वाढत चालला आहे.

 

एक तर नुकसानीत जाऊन कापड देण्याची वेळ यंत्रमागधारकांवर येत आहे. खर्चीवाले यंत्रमागधारकांना सध्या मिळणारी मजुरी परवडत नसल्याचे सांगण्यात येत आहे. नुकसानीत जाण्यापेक्षा १२ तासांच्या दोन शिफ्टपैकी एकच शिफ्ट सुरू ठेवण्याची त्यांची मानसिकता तयार होत आहे. दिवाळीनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

योजना केवळ कागदावरच

 

स्वतःचे सट असणारे यंत्रमागधारकही कमी कापड उत्पादन करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे सध्या एक-एक करीत शहरातील सुमारे ७० टक्के साधे यंत्रमाग कारखाने एकाच शिफ्टमध्ये सुरू ठेवले जात आहेत.

 

मुळात साध्या यंत्रमागांची संख्या कमी-कमी होत चालली आहे. त्यांच्याबाबतची एकही शासनाची दिलासा देणारी योजना येताना दिसत नाही. उलट साध्या मागाचे आधुनिकीकरण करण्याची योजनेची घोषणा होत आहे. पण, त्याचा प्रत्यक्षात लाभ होताना दिसत नाही. त्यामुळे या योजना केवळ कागदावरच राहत असल्याच्या चर्चाही होत आहेत.

 

नुकसान टाळण्यासाठी एक शिफ्ट

 

साध्या यंत्रमागावर केंब्रीक, पॉपलीन, धोती, मलमल अशा क्वालिटीच्या कापडाचे उत्पादन केले जाते. पण, अलीकडे एअरजेट, रॅपियर मागावर या कापडांचे उत्पादन अधिक केले जात आहे. त्याचाही नकळत परिणाम साध्या यंत्रमाग उद्योगावर होत आहे.

 

कापडाला माकापडाला मागणी व दर येत नसल्यामुळे व जादा नुकसान टाळण्यासाठी एकाच शिफ्टमध्ये साधे यंत्रमाग सुरू ठेवण्याकडे कल वाढत आहे. यामध्ये पुढील काळात सुधारणा न झाल्यास साध्या यंत्रमागाचा खडखडाट हळूहळू बंद पडत जाण्याची भीती आहे.

 

कामगार टंचाईने त्रस्त

 

सध्या यंत्रमाग उद्योगात सर्वाधिक टंचाई कामगारांची जाणवत आहे. सामाजिक सुरक्षा देणारी कोणताही योजना यंत्रमाग कामगारांसाठी नाही. शासनाकडे सातत्याने मागणी होऊनही स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आलेले नाही.

 

त्यामुळे नवीन कामगार या उद्योगात येण्यास तयार नाहीत. मुळात मंदीचे वातावरण आणि कामगारांची टंचाई यामुळे कारखाना एकाच शिफ्टमध्ये सुरू ठेवण्याची मानसिकता तयार होत आहे. त्याचा नकळत काही कामगारांना फटकाही बसत आहे.

 

गणी व दर येत नसल्यामुळे व जादा नुकसान टाळण्यासाठी एकाच शिफ्टमध्ये साधे यंत्रमाग सुरू ठेवण्याकडे कल वाढत आहे. यामध्ये पुढील काळात सुधारणा न झाल्यास साध्या यंत्रमागाचा खडखडाट हळूहळू बंद पडत जाण्याची भीती आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -