ताजी बातमी ऑनलाईन टीम
उद्यापासून बारा दिवस 12 रेल्वे बंद
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा बेळगाव ते सांबरा आणि मिरज ते लोंढा मगावरील काही रेल्वे स्टेशनदरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण सुरु असल्यामुळे शनिवार दि. 18 ते 29 जूनदरम्यान अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये बेळगाव-शेडबाळ पॅसेंजर, हुबळी-दादर (एलटीटी) एक्स्प्रेसचा समावेश आहे.
रेल्वे क्र. 07335 -07336 ही बेळगाव – शेडबाळ धावणारी पॅसेंजर रेल्वे दि. 18 ते दि. 29 जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे. ही गाडी 12 दिवस बंद राहणार आहे. रेल्वे क्र. 17326 ही म्हैसूर -बेळगाव एक्स्प्रेस रेल्वे 22 ते 28 जूनपर्यंत बंद असणार आहे. रेल्वे क्र. 17325 ही बेळगाव -म्हैसूर एक्स्प्रेस रेल्वे 23 ते 29 जूनपर्यंत बंद असणार आहे. रेल्वे क्र. 17318 ही दादर ते हुबळी (एलटीटी) एक्स्प्रेस रेल्वे 23 ते 29 जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
तिरुपती एक्सप्रेस धारवाडमधून सुटणार छत्रपती शाहू महाराज टर्मिनेस कोल्हापूर येथून सुटणारी तिरुपती एक्स्प्रेस आता दि. 23 ते 29 जून दरम्यान धारवाडपासून सुटणार असून, तिरुपती ते धारवाडपर्यंतच येणार आहे. यामुळे कोल्हापूरहून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार आहे.