Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगपंढरपूर मंदिर समितीचा मोठा निर्णय ; वारकऱ्यांना ‘या’ सुविधा मिळणं झालं सोपं..

पंढरपूर मंदिर समितीचा मोठा निर्णय ; वारकऱ्यांना ‘या’ सुविधा मिळणं झालं सोपं..

राज्यात आषाढी वारी करण्यासाठी पंढरपुरात 15 लाखांहून जास्त भाविक येऊ शकतात, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. रस्त्याने गावागावातून पायी निघालेली वारी अनेक मुक्काम करत गाव, शहर, वाड्या मधून पंढरपूरला पोहोचत असते. तिथे गेल्यावर सोयी-गैरसोयी पाहता सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 6 विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन वारकऱ्यांसाठी एक मोबाइल अ‍ॅप तयार केलं आहे.

मंदिर समितीचे ‘पंढरीची वारी’ अ‍ॅप…

मुक्कामाच्या ठिकाणी वा दिंडी मार्गक्रमण करताना वारकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वारीच्या काळात वारकऱ्यांना मदत व्हावी म्हणून पंढरपूर मंदिर समितीने ‘पंढरीची वारी’ हे मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. यावर वारीच्या काळात प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा व पंढरपुरात वारकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची, सूचनांची, तात्काळ माहीती पुरवण्यासाठी हे अ‍ॅप तयार केलं गेलं आहे. आजकाल बहुतांश जणांकडे अँड्रॉइड स्मार्टफोन असल्याने यामुळे वारकरी वेळोवेळी अपडेट राहतील.

पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 6 विद्यार्थ्यांकडून तयार करून घेण्यात आले आहे. त्यांनीही कष्ट घेऊन लवकरच म्हणजे अगदी दीड महिन्यांतच हे अ‍ॅप तयार करून दिलंय. अ‍ॅपमध्ये गरजेप्रमाणे आणखी बदल केले जाणार आहेत.

प्ले स्टोअरवर पंढरीची वारी Pandharichi Wari असं सर्च केलं की तुम्हाला अ‍ॅप डाऊनलोड करता येईल. येणाऱ्या काही दिवसांतच अ‍ॅपमध्ये गॅस सिलिंडरची सुविधा, हेल्पलाईन क्रमांक, एसटी, रेल्वेचे वेळापत्रकाचाही अ‍ॅपमध्ये समावेश करण्यात येईल, असं टीमप्रमुख मकर यांनी सांगितले.

वारकऱ्यांना होणार फायदा..

सोलापूर जिल्ह्यात पालखी सोहळ्याचा प्रवेश झाला की या अ‍ॅपचा वापर करता येणार

वारी मार्ग ते पंढरपूर शहरात पोहोचेपर्यंत हे अ‍ॅप उपयोगी ठरणार आणि पंढरपूर येथे सर्व पालख्या पोहोचल्यानंतरही हे अ‍ॅप दिशादर्शक ठरणार

विठ्ठल मंदिराकडे जाण्याच्या मार्गाबरोबरच पालखीची मुक्कामाची ठिकाणे, विसावा या ठिकाणी असलेल्या सुविधा या अ‍ॅपवरून शोधणे सोपे होणार

वारी मार्गावर पिण्याच्या पाण्याचे टँकर, शौचालय, जवळील शासकीय कार्यालये, पोलिस ठाणे, हॉस्पिटल, मंदिर, वाहनतळ, शाळा अशा गोष्टी अ‍ॅपवर दिसणार.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -