ताजी बातमी ऑनलाईन टीम
पुणे : राज्यातील जूनचा पहिला पंधरवडा मान्सूनसाठी फारसा पोषक नव्हता. मात्र, 19 ते 21 जून या कालावधीत तो वेग घेणार असून, कोल्हापूरसह राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’चा इशारा दिला आहे. विदर्भासह गुजरात, मध्य प्रदेशमध्ये मान्सून पोहोचला आहे.
यंदा मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र राज्य व्यापले असले, तरीही कमी दाबाचे पट्टे तयार होत नसल्याने बाष्पयुक्त ढगांच्या निर्मितीस खूप वेळ लागत आहे. त्यामुळे बऱ्याच भागात पावसाने दडी मारली आहे. मात्र, 19 जूनपासून परिस्थितीत किंचित बदल होत असून, पंधरा जिल्ह्यांना मुसळधारेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातून शुक्रवारी मान्सूनने गुजरात राज्यात प्रवेश केला.